कागदाच्या वाढत्या किमतीचे परिणाम पाठ्यपुस्तकाच्या किंमती १० ते २० टक्के वाढणार New books Maharashtra state board


      कागदाच्या वाढत्या किमतीचे परिणाम पाठ्यपुस्तकाच्या किंमती १० ते २० टक्के वाढणार

                प्तराचे ओझे कमी व्हावे यासाठी शासन सर्व शाळे मध्ये वह्यांची पाने जोडलेली पाठ्यपुस्तक वर्ष २०२३-२४ पासून उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. पण कागदाच्या वाढत्या दराचा परिणाम पाठ्यपु्तकांना बसणारं आहे.त्यामुळे पाठ्यपुस्तकाच्या किंमती १० ते २० टक्के वाढणार आहे.New books Maharashtra state board

   मागील वर्षी ऑक्टबरमध्ये राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी पाठ्यपुस्तकामध्ये कोरी पाने समाविष्ट करण्याची घोषणा केली होती. शालेय शिक्षण विभागाने मार्चच्या पहिल्या आठवड्यात त्यांची अमलबजावणी करण्यासाठी निर्णय घेतला.


           त्यानुसार जूनच्या शैक्षनिक वर्षा पासून इयत्ता पहिली ते आठवीच्या पाठ्यपस्तकांना वह्यांची पाने जोडली जाणार आहेत. याशिवाय इयत्ता दुसरी ते आठवीची पाठ्यपु्तके चार भागात विभागली जाणार आहे. वह्यांची पाने जोडली गेल्याने पुस्तकांच्या किमती वाढणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या