महात्मा गांधी विद्यालय आरमोरीत ‘एक पेड माँ के नाम’ उपक्रम
आरमोरी – महात्मा गांधी विद्यालय, आरमोरी येथे शालेय परिसरात इको क्लब व हरित सेनेच्या सहकार्याने ‘एक पेड माँ के नाम’ या उपक्रमांतर्गत वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला. केंद्र शासनाच्या महत्वाकांक्षी मोहिमेअंतर्गत आयोजित या उपक्रमाचे मार्गदर्शन विद्यालयाचे मुख्याध्यापक मा. साईनाथ अद्दलवार सर यांनी केले.
कार्यक्रमात मा. विरेंद्र गुंफावार, हरित सेना प्रमुख कुमारी सुषमा भांडारकर, कुमारी आर. पी. मावानी, श्री. हेमंत पेंदाम, श्री. पी. एस. सयाम, श्री. सी. पी. हजारे, श्री. एस. पी. चट्टे, व पंकज चांभारे यांची सक्रिय उपस्थिती होती.
या वेळी आंबा, जांभूळ, करंजी, सीताफळ, चिंच, आवळा , गुलमोहर इत्यादी जातींच्या झाडांचे शालेय परिसरात विद्यार्थी , विद्यार्थीनी,शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी स्वतःच्या मातांच्या नावाने वृक्षारोपण केले.



0 टिप्पण्या